0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पैकी 4,713 अनुज्ञप्ती सुरू आहेत. आज दिवसभरात 20 हजार 485 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात ( 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंद आहे.किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु असलेल्या जिल्ह्यांची नावे :- 1. ठाणे, 2. पालघर, 3. रायगड, 4. पुणे, 5. सोलापूर 6. अहमदनगर, 7. कोल्हापुर, 8. सांगली, 9. सातारा, 10. सिंधुदुर्ग, 11. रत्नागिरी, 12. नाशिक, 13. धुळे, 14. नंदुरबार, 15. जळगाव, 16. जालना, 17. लातुर, 18. नांदेड 19. हिंगोली, 20. नागपुर, 21. भंडारा 22. गोंदिया, 23. यवतमाळ, 24. अमरावती, 25. अकोला, 26. वाशिम, व 27. बुलढाणा.राज्यात दि.15 मे 2020 पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्यसेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेतस्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दूर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  ऑफलाईन पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा. राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.16 मे, 2020 रोजी राज्यात 74 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 38 आरोपींना अटक करण्यात आली असून  12 लाख 99 हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि.24 मार्च, 2020 पासुन दि.16 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,682 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,558 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 576 वाहने जप्त करण्यात आली असून रु.15.30  कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  हा ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे.

Post a comment

 
Top