0


BY - युवा महाराष्ट्र लाइव - रायगड |
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर त्यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केले आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच ईद साजरी करावी. घरीच नमाज पठण करावे. करू ईद साजरी घरी राहून, एकजुटीने कोरोनाला हरवू असे आवाहन त्यांनी केले आहे.सध्या जिल्ह्यामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढत आहे.त्यावर वेळेतच नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनी कटाक्षाने सोशल डिस्टंन्सिंग पाळणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे किंवा साबणाने हात वारंवार धुणे या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.ही आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी काळाची गरज बनली आहे, हे लक्षात घेऊन समाजातील सर्वच व्यक्तींनी जिल्हा प्रशासन देत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन  करावे, असेही आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

Post a comment

 
Top