0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
सध्या संपुर्ण जगकोरोनाच्या महाभयंकर संकटात सापडलेले असताना लॉकडाऊन असुन फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे.संपुर्ण जग हे अनेक संकटाना तोंड देत आहे.आर्थिक परिस्थिती मुळे दोन वेळचे धान्य ही सर्वसाधारण जनतेला मिळत नाही.काहीना निवारा नाही.परप्रांतियांचे हाल यापेक्षाही भयंकर आहेत.अशा परिस्थितीत मद्यपींचे लाड पुरविणे व महसुलीसाठी दारूची दुकाने उघडुन आमच्या माता भगिनींच्या डोक्याचा व्याप वाढविला जात आहे.मुरबाडमधील दारू विक्रीची दुकाने त्वरीत बंद करावीत व मुरबाड तालुक्यात कोणत्याही दारूविक्री दुकानास परवानगी देऊ नये असे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे शीतल दिनेश तोंडलीकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुरबाड तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे.मात्र आता याकडे प्रशासन लक्ष देर्इल का व काय कारवार्इ होर्इल याकडे सर्वांचे लक्ष लागूण आहे.


Post a comment

 
Top