0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार १११ रुपयांची मदत जमा केली आहे. श्री.परब यांनी मदतीचा हा धनादेश नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोना विषाणूविरुद्ध लढतांना राज्यातील व्यापारी, उद्योजक, कॉर्पोरेटर्स, स्वंयसेवी संस्था यांच्याप्रमाणेच अनेक बालयोद्धेही मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीची रक्कम जमा करत आहेत. आज साईशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मदत करणाऱ्या बालयोद्ध्यातआणखी एकाची भर पडली आहे.
साईशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी साईशाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतांना तिला आरोग्यसंपन्‍न दीर्घायु लाभो ही सदिच्छा व्यक्त केली आहे. माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी आज राज्यभरात वृत्तसंकलनाचे काम करत आहेत.  लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत. हे ही एक प्रकारे कोरोना विषाणूविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. आतापर्यंत राज्य शासनाला या सर्वांचे खूप चांगले सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आज वैभव परब यांनी कोरोनाविरुद्ध लढतांना मदतीत माध्यम क्षेत्र ही मागे नाही हे दाखवून दिले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


Post a Comment

 
Top