0

BY - ( नामदेव शेलार ),युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
नगरपंचायतीने शनिवारी रात्री 10 वाजता शहरात रिक्षा फिरवून सलग तीन दिवस पुर्णतः बंद राहिल.दुध,भाजीपाला,किराणा दुकाने बंद राहणार असं सुचविले असताना रविवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन इमारतीत संशयीत माल गोदामात खाली करण्यात आले.
          संपुर्ण शहराला वेठीस धरणार्‍या मुरबाड नगरपंचायत अधिकारी कर्मचार्‍यांशी संपर्क केला तसेच मुरबाड तहसिलदार कार्यालयात संपर्क करून संबंधित गोदाम धारकावर कारवार्इची मागणी केली असता नगरपंचायतीचे नोड अधिकारी,र्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून पुढिल कारवार्इ काय केली समजले नाही.
          एक मात्र खरं मुरबाड शहरात दुध किराणा,भाजीपाला बंद करून गोदामातुन माल घेऊन जाणे,गेऊन येणे असे प्रकार मोठे साठेबाज व्यापारी करतात त्याकडै संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतात.
          कृषी उत्पन्न बाजार समिती नवी बिल्डींग ग्रामीण रूग्णाायासमोर आहे त्या व्यापारी गाल्यांच्या गोदामात अत्यावश्यक सेवे व्यतीरिक्त कोणतं संशयीत माल खाली आला आहे याचा तपास गुलदस्त्यात आहे.
          मुरबाड शहरात,तालुक्यात मोठया प्रमाणात गावठी दारूचे अड्डे बनले आहेत.पोलिसांनी कारवार्इ सुध्दा केली आहे परंतू दारूसाठी काळा गुळ,नवसागर कोणत्या गोदामातून कोठून येतो याची चौकशी अधिकारी करत नसून केवळ सामान्य नागरिकांना वेठीस धरत गोडावून यांच्यावर धाड मारून कारवार्इ करावी अशी मागणी होत आहे.


Post a Comment

 
Top