0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
“देशातील प्रत्येक नागरिकाने लोकल वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादनं (Be Vocal for Local) खरेदी करावं. आपल्याला लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तूंचा वापर करायचा आहे. याशिवाय लोकल वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमानही बाळगायचा आहे. लोकल उत्पादनाचा प्रसार करा”, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे) पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जनतेला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या (Be Vocal for Local).आज तुम्ही ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड म्हणत आहात ते कधीकाळी असेच लोकल ब्रॅण्ड होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा वापर सुरु केला. त्यांनी त्या वस्तूंचा प्रचार आणि ब्रँण्डींग केली. याशिवाय त्या वस्तूंप्रती अभिमान बाळगला. त्यामुळे ते वस्तू आणि लोकलहून ग्लोबल बनले. त्यामुळे दररोज प्रत्येक नागरिकाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तू खरेदी करुन त्याचा प्रचार करा. मला पूर्ण विश्वास आहे आपला देश असं करु शकतो”, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. “कोरोना संकंटादरम्यान आपल्याला लोकल उत्पादन, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन याचंही महत्त्व समजलं आहे. संकंट काळात लोकलनेच आपली मागण्यांची पूर्तता केली आहे. आपल्याला या लोकलनेच वाचवलं आहे. लोकल फक्त गरजच नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकलला आपला जीवनमंत्र बनवावंच लागेल, हे आता वेळेने आपल्याला शिकवलं आहे”, असं मोदी म्हणाले.
       हे संकंट इतकं मोठं आहे की, चांगल्यातली चांगली आणि मोठी व्यवस्थाही हादरली आहे. मात्र, याच परिस्थितीत देशाने गरिब भारतीयांची संघर्ष शक्ती बघितली आहे. या परिस्थितीत त्यांच्या संयमतेचंही दर्शन घडलं आहे. खासकरुन रस्त्यावर ठेला लावणारे, फेरीवाले, अनेक घरांमध्ये काम करणाऱ्या श्रमिक नागरिकांनी खूप सोसलं आहे. त्यांनी खूप त्याग केला आहे. प्रत्येकाला त्यांची कमी जाणवली. आपल्याला त्यांना सुदृढ बनवायचं आहे आणि आपलं हे कर्तव्य आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


Post a comment

 
Top