0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
सामाजिक कार्यकर्त्या स्मिता  संजय दातीर यांची अन्याय अत्याचार निर्मुलन समिती (महाराष्ट्र राज्य) या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ति झाल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव. यांनी जाहीर केले आहे. स्मिताज फांउडेशन च्या संस्थापक-अध्यक्ष असलेल्या स्मिता संजय दातीर यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असुन वंचित,उपेक्षित व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांचा लढा अविरत सुरू आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचेवर पुणे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेच्या ध्येय धोरणांशी प्रामाणिक राहून संघटना बळकटी साठी प्रयत्न करणार असल्याचे स्मिता दातीर यांनी सांगितले. अन्याय अत्याचार निर्मुलन समिती पुणे जिल्हा कार्यकारिणी मध्ये साधना मेश्राम यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदावर  तर  जिल्हा उपाध्यक्षा संगिता तुरुकमारे यांचे सह  जिल्हा संघटक म्हणून मिलिंद गायकवाड जिल्हा सहचिटणिस ज्योती सावंत यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. लवकरच पुणे येथे बैठक घेवुन पदग्रहण समारंभात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे रविंद्रदादा जाधव यांनी सांगितले.  संघटनेच्या नवनियुक्त पदाधिका-यांचे समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव प्रदेश उपाध्यक्षा प्रा.प्रेमलताताई जाधव प्रदेश सचिव महेंद्र तथा (अण्णासाहेब) पंडीत कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांचेसह नासिक जिल्हाध्यक्षा राधा क्षीरसागर प्रसिद्धी प्रमुख योगेश गोसावी वसंतराव वाघ विनोद भोसले, संजय गायकवाड (निफाड) मीना शिरसाट, परविण बागवान (चांदवड) रेखा मंजुळकर, संदीप भालेराव (सिन्नर) यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. लवकरच पुणे जिल्हा कार्यकारीणीतील उर्वरीत पदाधिकारी यांची नियुक्ती पदग्रहण समारंभात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Post a comment

 
Top