0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहेत  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजार 162 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही रुग्णालयाने रुग्णांकडून भरमसाठी फी आकारली तर त्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे राजेश टोपे यांनी आज (7 मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकार कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करत आहे, याबाबतही माहिती दिली. यावेळी त्यांनी रुग्णांकडून जास्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.
     “आज अनेक रुग्णालये रुग्णांकडून वेगवेगळ्या पद्धतीने चार्जेस घेतात. रुग्णांकडून कुणी 1 लाख तर कुणी 50 हजार दररोज चार्जेस घेत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मात्र, रुग्णांकडून असे भरमसाठ चार्जेस घेणं हे कधीही चालणार नाही. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या कायद्यांचा विचार करुन आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयांना मनाला वाटेल तो रेट ठरवता येणार नाही. त्यासाठी काही इन्शुरन्स कंपनींचा आधार असणार आहे. जिप्सा आणि टीपीए या संस्थांच्या आधारे रुग्णांलयांना चार्जेस ठरवावे लागतील”, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

Post a Comment

 
Top