0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
वृत्तपत्र वाचल्यानं किंवा हाताळल्यानं कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचं स्पष्ट करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गानंतर वृत्ततपत्रानेही कोरोना होतो अशा अनेक अफवा सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. त्यामुळं याचा थेट परिणाम वृत्तपत्राच्या वितरणावर झालाय. मात्र वृत्तपत्र हाताळल्यानं कोरोनाचा संसर्ग होत नाही असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर तुमचा वृत्तपत्र विक्रेता हा पहाटेपासून तुमच्या सेवेसाठी आणि जगाच्या सर्व घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. या संकटाच्या काळातही तो त्याची भूमिका चोख बजावत आहे. त्यामुळं वृत्तपत्र हे पूर्णपणे सुरक्षित असून कुणीही अफवावंवर विश्वास ठेवू नये असं आवाहन राजेश टोपे यांनी केलंय.

Post a comment

 
Top