0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, आता पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत पोलीस 24 तास कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे पोलिसांप्रती सामाजिक बांधिलकी जपत अभिनेता अक्षय कुमारने नाशिक पोलिसांना 500 अत्याधुनिक हातातली घड्याळं दिली आहेत. (Akshay Kumar Help Nashik police)  हे घड्याळ पोलिसांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करणार आहे.अभिनेता अक्षय कुमार याच्यासह दातार कॅन्सर जेनेटिक्स यांच्याकडूनही नाशिक पोलिसांना 2 हजार 700 घड्याळांचं वाटप करण्यात आलं आहे. हे घड्याळ दररोज शरीराचा रक्त दाब, तापमान, किती चाललो आणि किती कॅलरीज बर्न झाल्या याबाबत सविस्तर माहिती देते. विशेष म्हणजे हे अत्याधुनिक घड्याळ जर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या हातात असेल तर दिवसभरात हे अधिकारी किती फिरले? त्यांनी कामं केलीत का? याचंही मोजमाप करण्यास मदत मिळेल. गोकी या कंपनीच हे घड्याळ तयार केलं आहे. हे घड्याळ आता पोलीस आयुक्तालयातील 225 अधिकारी आणि 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या घड्याळांचा चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अक्षय कुमार आणि दातार कॅन्सर जेनेटिक्स यांचे आभार मानले आहेत.


Post a comment

 
Top