0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – अमरावती |
गेली 30 वर्षे राज्यात देश पातळीवर पत्रकारिता करणारे ज्येष्ट पत्रकार नामदेव पांडुरंग शेलार आणि ज्योती नामदेव शेलार विकासमंच ट्रस्ट अध्यक्षा महाराष्ट्र राज्य या शेलार दांपत्याना कला फाऊंडेशन पिंपळोद अमरावती संस्थेच्या वतीने 2020 चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे.राज्यभरातील सुनिल गोपाळ (धुळे),अविनाश कदम(करमाळा),सुनिल सकट(नगर),रक्षा बबनराव नगरील (यवतमाळ),सौ.ज्योती नामदेव शेलार (ठाणे),नामदेव पांडुरंग शेलार (ठाणे),मनोज बाचले (वर्धा),उत्तम वानखेडे (सिंधी रेल्वे),शरद पाटील (धुळे),साहेबराव काते (नगर),शरद वाढरे (वर्धा),प्रज्वल गांवडे (दर्यापुर),नंदिनी बर्वे(वर्धा),मंजुषा दरवरे (चंद्रपुर),मोहमद शकील जाफरी (पुणे),विजया भांगे(परतवाडा),विशाल जायक (वर्धा),समुखदास बोधानी (अमरावती),दिपक जुढेकर (वर्धा),अर्जुमन बोता शेखर (चंद्रपुर),कमलेश निरंजने (चंद्रपुर) या मान्यवारांना समाजभुषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.कला फाऊंडेशनचे प्रमुख गिते हे राज्यातील समाजभुषण पत्रकार गुणवंताचा पुरस्कार देवुन दरवर्षी सन्मान करतात,यंदाही हा सन्मान सोहळा होणार आहे.विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा ज्योती शेलार यांनी राज्यातच नव्हेतर गुजराथ,गोवा,केरळ, राज्यस्थान,मध्यप्रदेश अन्य राज्यात आपले समाजकार्य नेले आहेत.वृत्तपत्र,टिव्ही चॅनलचे उपसंपादक तथा विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा म्हणुन त्यांच कार्य प्रेरणादायक आहे.गरीबांना न्याय संकटसमय मदत आरोग्य,शिक्षण,रोजगार,शासकीय योजनांचा लाभ स्वतः अर्थिक मदत अशा उपक्रमाने हजारो नागरिकाना लाभ मिळाला आहे.हजारो कार्यकर्ते उभे राहिले आहे.त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबार्इ फुले पुरस्कार जाहिर झाल्याने त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.सौ.ज्योती शेलार यांना कोल्हापुर,अमरावती,नगर,कोकण पत्रकार संघ ठाणे,गुजराथ अशा विविध ठिकाणी पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे.शेतकरी शालेय विद्यार्थी,आदिवासी बांधव,निराधार महिला,गोरगरीब नागरिक,अपंग,अनाथ मुले,गरीब विद्यार्थींना मदतीचा हात देऊन शासनाकडे शेतकरी कष्टकर्‍यांसाठी न्यायीक भुमिका मांडली आहे.
Post a comment

 
Top