0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने, कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे मोठ्या संख्येने मजूर रस्त्यावर आले. सार्वजनिक वाहतूकही बंद असल्यामुळे स्थलांतरित मजुरांना घरी जाणेही अशक्य होते. अखेर 42 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नवी मुंबई येथून मध्य प्रेदशातील 1200 मजुरांना पहिल्या विशेष रेल्वेने भोपाळ येथे पाठवण्यात आले.हे सर्व स्थलांतरित मजूर कामानिमित्त नवी मुंबईत आले होते. पण लॉकडाऊननंतर अनेकांना कंपनीतील मालकांनी काढून टाकले होते. त्यामुळे त्यांच्या जेवणाचे-राहण्याचे हाल होत होते. यावेळी सरकारकडून मजुरांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Post a Comment

 
Top