0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या स्थलांतरित कामगार, नागरिकांना घरी जाता यावं यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 1 जूनपासून 200 प्रवासी गाड्या चालवण्याची घोषणा केली. या गाड्यांचे बुकिंग गुरुवारी सकाळी दहा वाजता सुरू झाले आणि एका तासाच्या आत सुमारे दीड लाख तिकिटे बुक करण्यात आली. एसी स्पेशल आणि श्रमिक स्पेशल ट्रेन व्यतिरिक्त रेल्वेने या 200 गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांमध्ये सामान्य बोगींसाठी तिकिटेही बुक करता येतील. पुष्टी केलेल्या तिकिटाशिवाय या गाड्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही असं रेल्वे प्रशासनाकडून अगोदर स्पष्ट करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसाठी रेल्वेने 1 जूनपासून 200 रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज सकाळी तिकीट बुकिंगची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होताच पहिल्या एक तासातच जवळपास दीड लाख तिकिटे बुक करण्यात आली. रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, प्रवाशांनी 1 जूनपासून धावणार्‍या 73 गाड्यांसाठी 1,49,025 तिकिटे अवघ्या एका तासात बुक केली आहे. त्याअंतर्गत 2,90,510 लोकांची तिकिटे बुक केली आहे.


Post a comment

 
Top