web-ads-yml-728x90

Breaking News

सहाय्यक पोलिस फौजदार बाळासाहेब जाधव यांनी स्वतःच्या आवाजात गाणं काढून केले कोरोनाबाबत जनजागृती


BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – कर्जत |
महाराष्ट्र पोलिस सेवेत,नेरळ पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस फौजदार म्हणून कार्यरत असणारे बाळासाहेब महादेव जाधव यांनी कोरोना व्हायरस  रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेत स्वतःच्या आवाजात गाणं काढून कोरोनाबाबत जनजागृती  केली आहे.त्यांची भुमिका " सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " ची असून पोलिस क्षेत्रात त्यांचे कार्य निर्भिड,प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षाचा ठसा उमटविला आहे.
सध्या आपला भारत देश हा कोरोना व्हायरस विषाणूचा सामना करत आहे.त्या कोरोनावर आपला विजय हा नक्कीच होणार यासाठी नागरिकांची साथ सरकारला हवी आहे.खरी ताकद दाखविण्याची हीच ती  वेळ आहे त्यासाठी संपुर्ण पोलिस यंत्रणा विविध  उपाययोजना व जनजागृती प्रयत्न करित आहे.गर्दीचे ठिकाण  टाळावे,त्या जनजागृतीला नागरिकांचे सहकार्य हे मोलाचे आहे त्यामुळे शासनाला सहकार्य करा आणि जिंकू आपण कोरोनाविरूध्द हा लढा अशा भावनाही सहाय्यक पोलिस फौजदार बाळासाहेब जाधव यांनी आमच्या  युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.श्री.बाळासाहेब जाधव यांना महात्मा गांधी तंटामुक्त गावाच्या योजनेत पुरस्कार देवून गौरविण्यातही आले आहे.
          बाळासाहेब जाधव हे माणसातील माणूसकी जपणार्‍या पोलिस क्षेत्राबरोबर त्यांना गाण्याची आवड राहीली आहे.त्यांची  कुशल संगीतकार व गीतकार,गायक म्हणून ओळख ठरली आहे.त्यांनी अलीकडे "घरात बसा फिरता  कशाला,कोरोना होर्इल मरता कशाला"," भिमजयंती साजरी करायची घरात पुस्तक वाचून  "  हे गीत स्वतःच्या आवाजात गायले आहे तर या गाण्याला गीत राहुल वाघमारे,संगीत सुमेध जाधव यांची साथ मिळली  आहे.त्यांनी बनविलेल्या गाण्याने सर्वत्र सोशल मिडीया व नेरळ परिसराबरोबर संपुर्ण जिल्हयात,महाराष्ट्रात त्यांची चर्चा आहे.पोलिस म्हणून त्यांनी केलेल्या कार्याच्या धडाकेबाजीचा सुर सर्वत्र उमटला असून कोरोनाशी लढा देणार्‍या सलाम महाराष्ट्र पोलिसांचे योगदान मोलाचे आहे असे नागरिकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.


No comments