web-ads-yml-728x90

Breaking News

तपासणीसाठी गेलेल्या मुरबाडच्या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह मुरबाड कराना दिलासा

BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
परदेशातुन मुरबाडला आलेल्या एका नागरिकाला होम क्वॉरांटार्इन मध्ये आपल्या घरातच ठेवण्यात आले होते.त्याचे तपासणी रिपोर्टचा आहवाल आल्यानंतर त्यांना मुंबर्इला तपासणीसाठी रूग्णालयात तातडीने नेण्यात आले.सदरची घटना मुरबाडमध्ये कोरोनाचा रूग्णं अशी बातमी पसरली डॉक्टर नगरपंचायत तहसिलदार यंत्रणा विद्यानगर परिसरात पोहचली इमारती संपुर्ण सिल करून जंतुनाशक फवारणी केली.त्याच नागरिकाच्या लहान मुलगी पत्नीला ठाणे येथे रात्री 12 वाजता घेवुन गेले मात्र त्यांना तीन वाजता बेड मिळाला इकडे मुरबाड शहरात अत्यावश्यक सेवा भाजीपाला दुध किराणे दुकाने बंद करून एकही नागरिक घराबाहेर पडु दिले नाही.तीन किलो मिटर अंतर सिल केले लोकाना आत्यावश्यक वस्तु पासुन वंचित राहावे लागले प्रशासनाने कर्तव्यपार पाडले नागरिकांनी प्रशासनाचे आणि आपले कर्तव्य पार पाडुन आरोग्याची काळजी घेतली अशा भितीच्या वातावरणात आनंदाचा संदेश आला….!
     12 दिवस होम क्वॉरांटार्इन असलेल्या घरातील त्यांची मुलगी आणि पत्नी यांचा कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.या आनंदाच्या बातमीने मुरबाड मध्ये आनंदाचं वातावरण आहे.शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.बनसोडे यांच्याशी युवा महाराष्ट्र लार्इव्ह चॅनेलच्या संपादकानी संपर्क केला असता त्यांनी त्याला दुजोरा दिला मात्र रूग्णांना घरी आणायाला शासकीय यंत्रणा सुसज्ज नसल्याचे दिसुन आले.या लहान मुलीच्या वडीलाचाही रिपोर्ट दोन दिवसात येर्इल असे त्यांच्या नातेवार्इकांनी सांगितले मात्र खरं ज्या घरात बाप आर्इ मुलगी एकत्र होती बाप जरी दुसर्‍या रूम मध्ये होता तरी कोरोनाचा संसर्ग पत्नी मुलीला झाला नाही ही आनंदाची बातमी आहे.

No comments