BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
सोशल डिस्टन्सींग पाळा
आणि कोरोनाचा संसर्ग टाळा, याची चांगली प्रचिती
सांगली जिल्ह्यात अनुभवयास आली असून परदेशवारी केलेले पहिले चार रुग्ण कोरोना मुक्त
झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सींग पाळून कोरोनाविरुद्ध सुरू असलेले
युद्ध जिंकावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री
जयंत पाटील यांनी केले आहे.
राज्यातील रूग्ण संख्या
वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा
परिषद यासह सर्व यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नागरिकांनी
देखील लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत घरीच राहून
सहकार्य करावे. अनावश्यक बाहेर पडू नये. विनाकारण
रस्त्यांवर येणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करतील, अशी वेळ न येऊ देण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन आवाहन मंत्रीमहोदयांनी
केले आहे.
Post a comment