web-ads-yml-728x90

Breaking News

त्या तंबाखुच्या पुडीचा झाला लिलाव...


BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
लॉकडाऊन मध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील पानटपर्‍या बम्द करण्यात आल्या असून गुटखा,तंबांखु या छुप्प्या पध्दतीने विक्री केली जात आहे.जो गुटखा 10 रूपयाला त्या  गुटख्याची किंमत घरातून 60 रूपये तर ज्या तंबाखुची  पुडी 7  रूपये त्या तंबाखूची किंमत 30 रूपये करून विक्री केली  जात  आहे.प्रश्‍न मग असा पडतो की,गुटखा तंबाखु अम्लयुक्त  पदार्थ येतो कुठून आणि जर  येत नसेल तर  बनावटी समजून तो कुठे बनविला जातो या प्रश्‍नाचे उत्तर मिळणं थोडं अवघडच आहे.मुरबाड तालुक्यात मन्नुभार्इचा वॉर्इन शॉप बंद  झाला तर तळीरामांचे पाय देशी दारू कडे वळाले तर काही ठिकाणी दारूचा साठा जादा भावाने विक्री केली जात आहे.चंगळ मंगळ वाले आता तंबाखूसाठी किराणा दुकानात  फिरतांना दिसत आहे.ज्या ठिकाणी देवांचे सामान  मिळतं तेथे तंबाखू मागायला येत असल्याने तंबाखू,गुटख्या पासून व्याकूळ झालेला व्यक्ती भ्रमण करतांना दिसला आहे.आपल्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह च्या पथकांनी गोपिनीय चौकशी ही सुरू केली आणि छुप्प्या पध्दतीने वेशभुषा बदलून जाऊन पाहोचले.त्या दुकानात ज्या दुकानात फक्त एकच तंबाखुची पुडी होती.तेथे तर चक्क तंबाखुच्या पुडीसाठी चौघा जणांनी रांग लावली होती.त्या ठिकाणी पाचवा आला.त्या पुडिची सुरूवात ही  20 रूपया पासून झाली.पुढे लिलाव हा सुरू झाला तो लिलाव अखेर 50 रूपयावर फायनल झाला आणि  लिलावातील एका व्यक्तीने तो पुडा 50 रूपयात खरेदी केला.अशा या तंबाखूच्या पुडिचा लिलाव झाला.ही आपल्याला काल्पनिक गोष्ट वाटेल परंतू ही वास्तविकता लॉकडाऊन काळात घडली आहे.युवा महाराष्ट्र लार्इव्हचे या छुप्प्यांकडे लक्ष लागून  असून पुढिल कल कोणत्या अम्लयुक्त पदार्थ्याच्या लिलावासाठी असेल याचे शोधात आहे.कारण सत्यता आम्ही सांगतो त्यावर कशी भुमिका सरकारने घ्यावी हे प्रशासकांच्या हाती आहे.No comments