BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह – मुरबाड |
मुरबाड तालुक्यातील एकलारे गाव सारख्या ग्रामीण भागातील गणेश
देसले यांची कला ही आगळी वेगळी असून चित्रपट सृष्टीतील विविध अभिनेते यांचा आवाज काढून
सर्व प्रेक्षक कलाकारांना आपली मिमेक्रीची कला दाखवनारे गणेश देसले यांची सर्व प्रथम
युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्यांच्या कलाकाराची जादूगिरी
लाखो जनतेपर्यंत पोहोचविण्यात विशेष मेहनत घेतली.त्यांची प्रथम मुलाखत
युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या स्टुडिओ मध्ये झाली त्यांनतर याच गणेश देसले
यांना मिमेक्री मॅन असे नाव युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीने दिले.त्यामुळे
त्यांना मिमेक्री मॅन म्हणून ओळख प्राप्त झाली असून त्यांची सुरूवात मुरबाड येथून झाली
असताना संपुर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रसरसलेल्या आवाजांची जादू एैकण्यासाठी हजारो
जनता आतुरतेने गर्दी होतांना पाहिले आहे.जुने कलाकार,नवे कलाकार यांची हुबेहुब आवाजाची
मिमेक्री करून नागरिकांना हसवणारे गणेश देसले यांच्या यशाचे परिपुर्ण मानकरी त्यांचे
गुरू महाराष्ट्राचे लाडके गायक जगदीश पाटील हे असल्याचे त्यांनी चर्चा संवादतेत सांगितले
आहे.
![]() |
( मिमेक्री मॅन गणेश देसले ) |
सर्वांचे स्वप्न असतात या मिमेक्री मॅन
चेही स्वप्न जे होते ते अखेर साकार झाले.मिमेक्री मॅन गणेश देसले एक दिवशी अंधेरी येथे
मिमेक्री शो करण्यास गेले होते त्यावेळी जोगेश्वरी येथे त्यांचे आवडते चित्रपट सृष्टीचे
अभिनेता जॉन अब्राहम यांची ‘ अटॅक ‘ चित्रपटाची
शुटींग ही चालू होती या दरम्यानच मिमेक्री मॅन गणेश देसले यांनी जॉन अब्राहम यांना
फोन लावला व मला आपली भेट घ्यायची आहे असे जॉन अब्राहम यांना सांगितले यावर जॉन अब्राहम
यांनी होकार दिला व त्यांच्याशी भेट झाली.तेव्हा मिमेक्री मॅन गणेश देसले यांनी जॉन
अब्राहम यांस आपली आवाजाची जादुगिरी दाखविली व त्यांचे स्वप्न अखेर साकार केले.तेव्हा
मिमेक्री मॅन गणेश देसले यांना अभिनेता जॉन अब्राहम यांनी पुढिल वाटचालीस शुभेच्छा
दिल्या आहेत.यावर मिमेक्री मॅन गणेश देसले यांनी त्यांचे स्वप्न साकार त्यांचे गुरूवर्य
जगदीश पाटील,युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी व प्रेक्षक,तमाम जनतेमुळे झाले असल्याचे
सांगितले आहे.
Post a comment