BY - युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |
मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला व
द्राक्षे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतातून थेट ग्राहकांच्या
दारातपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम यापूर्वीही सुरू होता. परंतु मोठ्या प्रमाणात
याची सुरुवात नाशिकमधून होत आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठा अडचणीत आला असून,
द्राक्षाचे तसेच भाजीपाल्याचे दर पडलेले आहेत. अशा परिस्थितीत 20 मेट्रीक टन
द्राक्षे, भाजीपाल्याच्या तीन गाड्या मुंबईला विक्रीसाठी पाठवून कृषि
विभागाने शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देण्यात खारीचा वाटा उचलला आहे, असे
मत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी कार्यालयामार्फत 20 मे. टन द्राक्षे व भाजीपाला थेट मुंबईच्या
ग्राहकांसाठी रवाना आला, त्यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी आमदार
दिलीप बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी
दिलीप देवरे, गोकुळ वाघ, कैलास खैरनार, संजय सुर्यवंशी व नाशिक व दिंडोरीचे तालुका
कृषी अधिकारी उपस्थित होते.
Post a comment