web-ads-yml-728x90

Breaking News

देशातील आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सर्वच मोठी कसरत करतांना दिसून येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले की, देशातील आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. सरकारने याबाबत अध्यादेश काढला आहे, त्याअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाणार आहे. डॉक्टरांवर ठिकठिकाणी हल्ले केले जात आहे. देशात बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या तक्रारी केंद्राला प्राप्त झाल्या आहेत. जे डॉक्टर्स कर्मचारी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दिवसरात्र एक करत आहे. त्यांच्यावर असे हल्ले होणे ही दुर्देवाची बाब आहे. सरकार ह्या गोष्टी सहन करणार नाही. असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हंटल आहे.यानंतर देशात राज्यात कुठेही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, यांच्यावर हल्ला झाल्यास हल्ला करणाऱ्या व्यक्तीला जामीन मिळणार नाही. तसेच हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.याशिवाय गंभीर प्रकरणात 6 महिन्यांपासून 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच 50 हजार ते 2 लाखांपर्यंत दंडही लावण्यात येणार आहेत.

No comments