web-ads-yml-728x90

Breaking News

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या महिलेची प्रस्तृती गोंडस मुलीला दिला जन्म


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
पनवेलवरून जालना बुलढाणा येथे पायी जाणार्‍या मजुरांना मुरबाड कुणबी समाज हॉल मध्ये व्कॉरंटार्इन करण्यात आले आहे.त्यातील एका महिलेने 16 एप्रिलला सरकारी रूग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला.नगरपंचायत मुरबाड यांच्या देखरेखीखाली ठेवलेल्या मजुरांची मुरबाडचे तहसिलदार अमोल कदम,नायब तहसिलदार प्रसाद पाटील,निवासी नायब तहसिलदार बंडू जाधव ,तलाठी शिंदे (तात्या) यांनी विशेष दक्षता घेवुन त्यांच्या अन्नपाणी सोयीसुविधा आरोग्याची काळजी घेतली आहे.पहिल्या लॉकडाऊन मध्ये आडकलेल्या मजुरांतील एक महिला गरोदर हेती तिने एका गोंडस मुलीला सरकारी रूग्णालय मुरबाड येथे जन्म दिला .डॉ.खंबायत,डॉ.ठोंबरे नर्स कर्मचारी यांनी त्या महिलेसह मुलीची विशेष काळजी घेतली आहे.तात्काळ तहसिलदार अमोल कदम यांनी स्थानिक तलाठी शिंदे (तात्या) व अन्य कर्मचार्‍यांना घटनास्थळी मदतीस पाठवून मजुरांच्या कौठुंबिक जिवनात आनंद मिळवुन दिला.मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बोराटे व त्यांच्या सहकार्यानी मजूरांच्या सुरक्षतेकडे जागता पहारा दिला आहे.


No comments