BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड
|
मुरबाड एम.आय.डी.सी मधील
अनेक कारखाने खुलेआम सुरू असून शासनाच्या पोटोकॉलची पायमल्ली केली आहे.25 टक्के कामगारांना
काम करण्याची मुभा असलेल्या कारखाण्यात 300 ते 500 कामगार काम करत असून काही कारखाण्यामध्ये
कल्याण,डोंबिवली,ठाणे, उल्हासनगर,बदलापूर मधून कामगार येत असल्याची चर्चा आहे.मुरबाड
तहसिलदारांनी स्थानिक कामगारांना कामावर ठेवण्याचे तसेच कारखाण्यातच राहण्याचा आदेश
असताना कारखानदार शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात.मुरबाड तहसिलदार,नगरपंचायत, आरोग्य
विभाग,पोलिस यंत्रणा यांनी याकडे लक्ष वेधून कारवार्इ करावी अशी मागणी स्थानिकांनी
केली आहे.काही कारखानदारांनी आमच्याशी बोलतांना सांगितले की,आम्ही 1000 धान्याचे किट
1000 मास्क अन्य मदत केली आहे.त्याचप्रमाणे अशा प्रकारे अनेक कारखानदार ठपकेदार,अवैध
धंदेवाल्यांनी मदतीच्या नावाखाली मनमानी सुरू केली आहे.
Post a comment