web-ads-yml-728x90

Breaking News

अखेर डाव फसला ; स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या धाडीत दारूभट्टीचा दारू विक्रेता अटक...

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सध्या बियरशॉप,वॉर्इन शॉप बंद असल्याने सर्व तळीरामांनी लॉकडाऊनमध्ये गावठी दारूकडे पाय फिरवले आहे.दारू बंद असल्याने तळीरामांनी थेट गावठीवर कचका उठविला असता दारूभट्टीतील दारू विक्री केली जात असल्याची अखेर कानकुन स्थानिक गुन्हे शाखा ठाणे यांना लागली.महाराष्ट्र पोलिसांची एकीकडे लॉकडाऊन संचारबंदी काळात आपली जबाबदारी पार पाडत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष मात्र,ग्रामीण भागातील छुप्यारूस्तमपणे धंदे करणार्‍यांवर लागून राहिले आहे.गुटखा असो की,गावठी दारू या लॉकडाऊन काळात मोठया प्रमाणात जादा रूपयात विक्री केली जात जरी असली तरी पोलिस प्रशासनाचे चहूकडील लक्ष कर्तव्यदक्ष पणे निभावतांना पुन्हा एकदा मुरबाडमध्ये दिसून आली आहे.
          दारूभट्टी हा नवा गैरव्यवसाय नाही त्यावर मात करण्यासाठी या अगोदरही पोलिस प्रशासन लक्ष लागून होती आणि आजही लक्ष लगून आहे.हे उचले गावातील बेकायदा दारू भट्टी उध्द्वस्त करून दाखवून दिले आहे.मिळालेल्या माहिती नुसार गोपिनीय पथकांनी माहिती काढली.वेळ ठरली आणि दिवसही ठरला.पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण शिवाजी राठोड,अप्पर पोलिस अधीक्षक संजय कुमार पाटील यांचे सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणपत सुळे, पो.हवा.महादेव बापू खोमणे,पो.नार्इक.अमोल कदम,पो.हवा.सुनिल कदम,पो.नार्इक सुहास सोनावणे,पोलिस मित्र संतोष हिरे यांनी पथक नेमून मुरबाड तालुक्याच्या उचले गावाच्या हद्दीत पुर्वेकडील जंगल टेकडी भागात एका धबधबा ओव्हाळाच्या जागेत दारू बनविण्यासाठी आरोपी हा बसला होता दारूचा साठा बनविण्याच्या तयारी चालू होती तेव्हाच स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाडी पोलिसांची धाड पडली.ही धाड इतकी सक्रीय होती की,त्या धाडेत आरोपी हा हातीच लागला.
या धाडीत दारू बनविण्यासाठी लागणारे नवसागर मिश्रीत गुळ,मोहाची फुले,ड्रम सह वॉश,कि.सु व अन्य साहित्य उध्दवस्त करून आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.या जागेत गैरकायदा गावठी दारू साठी साहित्यांची एकूण मालाची किंमत हि 1 लाख 975 रूपयी इतकी हस्तगत करण्यात आली असून सदरील आरोपीला अटक करून त्याच्यावर महाराष्ट्र प्रोव्हीशन अ‍ॅक्ट कलम 65 र्इ,65 फ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिस उपनिरीक्षक गणपत सुळे, पो.हवा.महादेव बापू खोमणे,पो.नार्इक.अमोल कदम,पो.हवा.सुनिल कदम,पो.नार्इक सुहास सोनावणे,पोलिस मित्र संतोष हिरे यांनी केलेल्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत असून दारूभट्टीवाल्यांच्या मनात गावठी दारू करण्याची भिती तयार झाली आहे.त्यामुळे पुढिल काळात दारूभट्टी ही नाहिशी होणार हे मात्र नक्कीच.


No comments