BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं
आहे. पण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधं यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले.
या सेवा 24 तास सुरु राहणार आहे. मात्र दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी
होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे मार्केट पूर्णपणे
बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
दादरच्या सेनापती बापट
मार्गावर घाऊक भाजीपाला मार्केट आहे. या ठिकाणी अनेक मुंबईकर नियमित भाजी खरेदी करताना
दिसतात. मात्र कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी या मार्केटचे
चार ठिकाणी विभाजन करण्यात आलं होतं. तर काही टक्के मार्केट हे दादरमध्ये ठेवण्यात
आले होते. पण घाऊक मार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याने पालिकेने हे मार्केट बंद करण्याचा
निर्णय घेतला आहे.
Post a comment