web-ads-yml-728x90

Breaking News

नागपूर पोलिसांची कृतिशील संवेदनशीलता


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपुर |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे प्रत्येक नागरिकाच्या घराबाहेर पडण्याला निर्बंध आले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना व न ऐकनाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करत असतानाच  नागपुरात एकही माणूस उपाशीपोटी झोपणार नाही यासाठी नागपूर पोलिसांची संवेदनशीलता त्यांच्या कृतिशील उपक्रमातून दिसत आहे.  अन्नदान, धान्यवाटप, जीवनावश्यक आदी वस्तूंचे वाटप करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना एकत्र करुन समन्वयकाच्या भूमिकेतून 15 लाख लोकांपर्यंत मदत वाटप सुरु आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतानाच लॉकडाऊनमुळे असंख्य नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यासोबतच जिल्ह्याची सीमाबंदी केल्यामुळे हजारो मजूर आहे तिथेच अडकून पडले. या पार्श्वभूमीवर शासनाने निवासगृहे सुरु केली. परंतु हातावर पोट असलेल्या नागरिकांपुढे दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. सामाजिक जबाबदारी स्वीकारत विविध स्वयंसेवी संस्थांनी मदत सुरु केली. परंतु ही मदत एका विशिष्ट भागापुरतीच मर्यादित राहत असल्यामुळे नागपूरचे अप्पर पोलीस महानिरीक्षक निलेश भरणे यांच्या संकल्पनेतून सामाजिक संस्थांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी ‘पोलीस वॉर रुम’ तयार करण्यात आली.पोलीस ‘वॉर रुम’च्या माध्यमातून  सामाजिक संस्थांच्या वितरणावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. तसेच शहरातील गरीब व गरजवंत वस्त्यांचे विधानसभा क्षेत्र निहाय वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये रेड, ऑरेंज व ग्रीन अशी विभागणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील नोंदणी केलेल्या 132 संस्थांच्या मदतीची  विभागणी करण्यात आली. या संस्थांमार्फत दररोज 95 हजार ते एक लक्ष लोकांपर्यंत शिजविलेल्या अन्नासह विविध साहित्यांचे वाटप होत आहे.

No comments