0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी मुंबई |
कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सावरण्यासाठी शेतमाल आता थेट सहकारी सोसायटीपर्यंत पोहोचणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांच्या दारापाशी शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला आणि फळे येत्या पंधरा एप्रिल पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.यासाठी कृषी विभागाने विशेष योजना तयार केली असून खारघर मधील सेंट्रल पार्क जवळ येथे व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्याचा शेतमाल थेट ग्राहकांना उपलब्ध होईल.मोठ्या गृहनिर्माण संस्था,लहान व्यापारी यांनी याबाबत सम्पर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

 
Top