web-ads-yml-728x90

Breaking News

घरातच हनुमान जयंती साजरी अनंत कथोरे यांनी घातले मारूतीरायाला साकडे...!


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सालाबाद प्रमाणे मोठया उत्सहाने साजरी होणारी हनुमान जयंती यंदा घरातच साजरी करण्यात आली.मुरबाड मधील जेष्ठ समाजसेवक अनंत कथोरे गेले 1973 पासुन घरातच हनुमान मंदीराची स्थापना करून  हनुमान जयंती उत्सव पालखीसोहळा करत आले आहे.
यंदा कोरोना सारख्या महाभयंकर रोगानी भितीचे सावट पसरल्याने अनंत गणपत कथोरे (जेष्ठ समाजसेवक) किसन अनंत कथोरे (मा.नगराध्यक्ष मुरबाड नगरपंचायत) यांनी हनुमंताची पुजा करून कोरोनावर मात करण्यासाठी साकडे घातले तसेच नागरिकांनी आपल्या घरातच राहुन सरकारचे नियम पाळा आरोग्याची काळजी घ्या असे आहवान केले.अनंत कथोरे यांच्या सोबत त्यांच्यापत्नी मुले सुना यांनी शेकडो गोरगरीब नागरिकांना अन्न धान्य मास्क सॅनीटायझरचे वाटप केले.

No comments