0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
‘कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल, तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं. यापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचं पालन करावं. नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊन स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात, मालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यानं चिंता वाढली आहे. मुंबईत कालच्या एका दिवसात साडेचारशेहून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील रुग्णांची संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. 24 मार्चच्या आधीपासून टाळेबंदी जाहीर करुनही झालेली वाढ गंभीर आहे. मुंबईतील 53 पत्रकार बांधवांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे, यातून कोरोनानं हातपाय कुठपर्यंत पसरले आहेत हे लक्षात येतं. तरीही शहरात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. यातून ते स्वत:च्या, कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत, हे थांबलं पाहिजे. घरातली व्यक्ती घराबाहेर जाणार नाही ही जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनी, मुलांनी घेतली पाहिजे. घराबाहेर जाण्यापासून सर्वांना रोखलं पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी  केलं आहे.

Post a comment

 
Top