BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
कालचा बसचा अध्यक्ष,एक
समर्थक आज लॉकडाऊनचा फायदा घेऊन किराणा मालावर इमारती बांधण्याचा विचार करत असून नागरिकांना
लुबाडत असल्याचे चित्र सध्या मुरबाड मध्ये दिसत असून चौकशी करण्यास संबंधित यंत्रणा
अपयशी ठरली आहे.एकीकडे भाववाढी करण्यात येऊ नये असे शासन सांगते व भाववाढ झाल्यास तात्काळ
तक्रार करा संबंधित दुकानदार,व्यवसायिकाची चौकशी करून कारवार्इ करू असे सांगते परंतू
वास्तविक पाहता कारवार्इ फक्त बोलबच्चन म्हणून राहिली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव त्यात
लॉकडाऊन घरी बसलेला गरिब घर कशावर भागवतो हे त्याचेच त्याला माहिती.कारण तांदूळाच्या
भातावर काय खाणार शेवटी त्याला इतर गरजू वस्तूसाठी खर्चाचा सामना करावा लागतो परंतू
अशा वेळी '' खिशात नाही दाना तर चालेल का शहाणा '' अशी म्हण सध्या चर्चेत आली असताना मुरबाडच्या
व्यवसायिक,दुकानदारांनी लॉकडाऊनचा फायदा घेत विविध गरजू व अत्यावश्यक वस्तूत भरमसाठ
वाढ केली आहे.या भाववाढीबद्दल केंद्रीय पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ
पत्रकार नामदेव शेलार यांनी थेट मुख्यमंत्री,ठाणे जिल्हाधिकारी यांना ऑनलार्इनद्वारे
सदरचा घडत असलेले प्रकार सांगितले व तात्काळ चौकशी करून संबंधित व्यवसायिक,दुकानदार
यांच्यावर कारवार्इ करण्याची मागणी केली होती.सदरील ठाणे जिल्हाधिकारी यांनी संबंधित
विभागाला पत्र पाठविले परंतु कोणत्याही प्रकारे चौकशी करण्यात आली नसून नागरिकांची
लयलूट अजूनही चालूच आहे.गरजू वस्तुचे लेबल ट्रकच्या काचेवर लावून गाडया भरून येतात
आणि विचारणा केल्यास वस्तु येत नसल्याचे नागरिकांना सांगून त्याच ट्रकमधील असलेल्या
वस्तुची चढया भावाने विक्री करून लुटमारी धंदा करत असून त्यांच्यावर कारवार्इ करण्यास
संबंधित यंत्रणा अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.तक्रार करूनही कारवार्इ
होत नाही मग मोठया डिंग्या मारू नये अशा संतप्त भावनाही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.मुरबाड
शहारात गोडाऊन रात्री भरली जातात,जादा भावाने विक्री केली जातात,तक्रार करण्यात येते
परंतू चौकशी होऊन त्या समर्थक अध्यक्षावर कारवार्इ केली जात नाही,त्यात नागरिकांचे
खिशे खाली झाले आणि यांची तिजोरी भरली,गोडाऊन भरले गेले व त्यांच्याच व्यापार्यांना
भाऊबंदकीत देऊन दोन्ही कडून होणारी नागरिकांची लूटमार अशा सर्व प्रकाराची हालचाल शासनाला
का दिसत नाही असा प्रश्न नागरिक करत आहेत.अत्यावश्यक किराणासाठा गोडाऊन मध्ये डांबून
ठेवला असून चौकशी केव्हा पावसाळयात होणार कि लॉकडाऊन उठविल्यानंतर असाही सवाल केला
जात आहे.
Post a comment