BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
कोरोना व्हायरस आजाराच्या लॉकडाऊन दरम्यान बंधिस्त गोरगरीब
नागरिकाना मुरबाड शहर शिवसेना प्रमुख रामभाऊ दुधाळे यांच्या पुढाकाराने हजारो लोकाना
अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.तसेच गोरगरीबाना दोन वेळा जेवण अन्य वस्तुचे वाटप
करण्यात आले.मुरबाड नगरपंचायतीच्या कामगारानी कोरोना साथीच्या कालावधीत शहराची चोवीस
तास निगाराखली स्वच्छता केली त्यांचे अभिनंदन करून त्यांना धान्याचे किट वाटप करण्यात
आले.मुरबाड
पोलिस ठाण्याचे हवालदार डोहीफोडे,भोसले,ज्येष्ठ नागरिक कराले,ज्येष्ठ पत्रकार नामदेव
शेलार,पत्रकार मंगल डोंगरे, मुरबाड शहर अध्यक्ष रामभाऊ दुधाळे,रोठे,हुमणे,दलाल,पोतदार,शहाणे अन्य कार्यकर्त्यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंग ठेवुन वस्तुचे वाटप करण्यात आले.राज्याचे
मुख्यमंत्री जनमाणसासाठी आहोरात्र मेहनत घेत आहेत.शिवसेना नेहमी संकट समयी पुढे मदतीला
असते त्याचांच आदर्श म्हणुन मुरबाड शहर शिवसेना शाखा प्रमुख रामभाऊ दुधाळे त्यांचे
सर्व पदाधिकारी यांनी मुरबाड शहरातील रिक्षावाले गोरगरीब नागरिक आदिवासी बांधव सर्व
जाती धर्माच्या लोकाना मदतीचा हात देवू केला असुन जनसामान्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासून शासनाला मदत करणार्या पत्रकार यानाही मदतीचा
हात देणार असल्याचे सांगितले.कोरोनावर मात केल्यानंतर कोरोना लढार्इत जनसेवेत असणार्या
सर्व अधिकारी ,डॉक्टर ,पत्रकार ,कर्मचारी ,नर्स यांचा सन्मान शिवसेनेतर्फे केला जार्इल
अशी ग्वाही त्यांनी दिली.ठाणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमूख बाल्यामामा म्हात्रे यांनी
मुरबाड तालुक्यासाठी धान्यवस्तुच्या किटची मदत उपलब्ध करून दिली.अन्य लोकानी नेत्यांनी सहकार्य केल्याचे
रामभाऊ दुधाळे यांनी सांगितले.लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासुन आजपर्यंत 24 तास मदतीचा
हात जनसामान्याना देणार्या मुरबाड शिवसेना शहर प्रमूख रामभाऊ दुधाळे यांचे कार्य अखंड
सुरू आहे.
Post a comment