web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड नगरपंचायतीकडून नोडल अधिकारी म्हणून जगन्नाथ नामदेव जाधव यांची नियुक्ती ; जगन्नाथ जाधव व त्यांच्यासह कर्मचार्यांची भुमिका ठरली कर्तव्यपरायणाची


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
लॉकडाऊन त्यात संचारबंदी तद्नंतर रेड झोन यामध्ये सर्व नागरिकांच्या संरक्षणासाठी वेगाने तैन्यात करण्यात आलेली अधिकारी वर्गांची यंत्रणा ग्रामीण भागात कोरोनाला वेशीच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या मुरबाड तालुक्याला आजही जिल्हाधिकारी व त्यांच्या आदेशान्वये सुसज्ज करण्यात आलेली कर्तव्यदक्षाची भुमिका साकारणारे कर्मचारी वर्ग यांच्या कार्याची प्रशंसा सर्वत्र केली जात आहे.
मुरबाडचे तहसिलदार यांच्या अधिपत्याखाली व मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित पध्दतीची आखणी करण्यात आली.यामध्ये नोडल अधिकारी यांची कामगिरी पाहिली या कामगिरीत सर्व नगरपंचायत अधिकारी कर्मचारी  यांनी घेतलेली मेहनत आज कोरोनाशी सुरू असलेली लढार्इत सामील झालेले आपणाला निदर्शनास अवगत झाली असल्याचे पाहण्यात आली आहे.मुरबाड येथिल कृषी  उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फळे,भाजी मार्केट भरविण्यात येत असून यावर निरिक्षणासाठी मुरबाड नगरपंचायतीचे नोडल अधिकारी म्हणून जगन्नाथ नामदेव जाधव यांची निवड करण्यात आली आहे.नोडल अधिकारी जगन्नाथ जाधव यांचे समवेत त्यांचे कर्मचारी वर्ग नागरिकांची गर्दी न हो यासाठी सकाळीच मार्केट चालू होण्याअगोदर सज्ज असतात.
गेले 15 ते 20 दिवस नोडल अधिकारी जगन्नाथ जाधव यांचे सह कर्मचारी व स्वतः मुख्याधिकारी परितोष कंकाळ हे यांच्या देखरेखित सुनियोजित पध्दतीने मार्केट भरविले जात असल्याने कोरोनाला हरविण्यासाठी आपली परिपुर्ण ताकद लावल्याने सर्वत्र या अधिकारी,कर्मचारी वर्गांची प्रशंसा केली जात आहे.कोरोनावर मात करताना नियोजबध्दाने सुरूवात करून आजही मुरबाडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही ही मुरबाड करांसाठी आनंदाची बातमी आहे.नोडल अधिकारी जगन्नाथ जाधव यांची भुमिका कर्तव्यपरायणाची असल्याने मार्केटमधील नागरिकांची गर्दी ही टळली आहे.त्यांची एक झलक डिस्टंसिंग सांगून जाणारी आहे त्यामुळे पहिले होणारी गर्दी ही आत्ता नोडल अधिकारी जगन्नाथ जाधव यांचे कारकिर्दीत होत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून दिलेल्या जबाबदारीला पेलवणारी ठरली आहे.
त्यांच्या कामगिरीवर युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी ही प्रथम दिवसापासून पाहून आहे त्यांच्या कामगिरीने माणूसकी झरी जपण्याचे काम केले असून त्यांची वरिष्ठ अधिकारी यांनी केलेली नियुक्ती ही योग्यच असून त्या कर्तव्याला नोडल अधिकारी जगन्नाथ जाधव हे खरे उतरले आहेत.त्यांच्या समवेत असणारे कर्मचारी हे त्यांच्या समवेत मोठया धाडसाने आपली भुमिका जोपासत असल्याचे निदर्शनास आले आहे.No comments