web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे ग्रामीण पोलिस मेजर संजय हिरू घुडे यांच्या गाण्याची महाराष्ट्रात चर्चा

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2020 रोजीच्या जयंती निमित्त मुरबाड तालुक्याचे भुमिपुत्र तसेच महाराष्ट्र पोलिस म्हणून ज्यांची ओळख आहे असे ठाणे ग्रामीण पोलिस मेजर संजय हिरू घुडे यांनी सुंदर असे भिमगीत बनविले असून त्या गाण्याची चर्चा संपुर्ण महाराष्ट्रात आहे.सध्या कोरोना सारख्या संसर्ग रोगाने देशात हाहाकार माजवून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी सर्वत्र देशातील नागरिक एकवटले असून प्रतिसाद दिला आहे.कोरोनामुळे यंदाच्या वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही घरामध्ये साजरी करण्यात येणार आहे.लोकहितासाठी,देशासाठी आपण घरातच बाबासाहेबांची जयंती साजरी करून सामाजिक एकतेचे दर्शन घडवून कोरोनाला हरवू ही विनंती डॉ.दिलीप धानके यांनी लिखीत गीताद्वारे जनजागृती करून एका गाण्याच्या माध्यमातून केली आहे.या गाण्याचे  गायक/ संगीत ठाणे ग्रामीण पोलिस मेजर संजय हिरू घुडे हे आहेत.गीतकार डॉ.दिलीप धानके,म्युझिक कंपोझर ज्ञानेश्वर दुधाळे,कोरस म्हणुन काशिनाथ पागर,निलेश घुडे,बंटी मोहपे तर रकिॉर्ड मिक्स रूपेश गोंधळी तर व्हिडीओ प्रोडेक्शन जय कैलास मनोरे यांनी काम पाहिले आहे.
या गाण्याला माझे मित्र,पोलिस वर्ग व मुरबाडचे डि.वाय.एस.पी.डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी संजय घुडे यांनी सांगितले.

No comments