web-ads-yml-728x90

Breaking News

रूग्णालयात जाणार्‍यांना दंडूका देवून परत पाठविले...


BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
संचारबंदी काळात मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून कल्याण,उल्हासनगर मधील उच्च  यांत्रिक दवाखाण्यात उपचार घेणार्‍यावर मरणाचे संकट कोसळले आहे.
          अनेक महिला,पुरूष,लहान मुले,वयोवृध्द गरोदर महिला यांच्यावर कल्याण उल्हासनगरमध्ये वर्षानुवर्षे उपचार सरू आहेत.परंतु मुरबाड वरून कल्याण,उल्हासनगर येथिल उपचार तसेच औषधे घेण्यास जाणार्‍यांना खेमाणी,म्हारल् नाक्यावर पोलिस दंडूके घालून मुरबाडकडे परत पाठवत आहेत.
          जास्त गंभीर आजारी असणार्‍यांनाच पोलिस जावून देत असल्याचे सांगत असून रूग्णांबरोबर एकच व्यक्ती पाठवले जाते अशा महाराष्ट्र संचार बंदीने रूग्णांचे जीव धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
          शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी,काँग्रेस असे सगळेच अन्नदान देण्यासाठी वस्तू वाटपासाठी  थव्याने  फिरतात  त्यांच नेतेही आरोग्याची सोय करून देण्यास पुढे येत नाहीत,एरवी रोज अँम्ब्युलन्स धावणार्‍या गायब झाल्या आहेत.ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री,राज्याचे गृहमंत्री,स्थानिक आमदार,कासदार यांनी रूग्णांना दवाखाण्यास जाण्यास पोलिसांनी लाठ काठी चालवू नये त्यांना उपचारासाठी,औषधासाठी फार्इल पाडून डॉक्टरांशी फोनवर संपर्क साधून जाऊन द्दयावे,अत्यावश्यक कामे नियमाचे पालन करून करण्याची परवानगी द्दयावी अशी रूग्णांच्या  मागणी आहे.
          मुरबाड ग्रामीण रूग्णालयाच्या आवारतून प्रसिध्दी समाजसेवक,शासन,लोकप्रतिनिधी यांना कल्याण,उल्हासनगर येथे रूग्णांचे उपचार होण्यासाठी अँम्ब्युलन्स उपलब्ध करून द्दयावेत अन्यथा उपचारासाठी रूग्णालयात जाणार्‍या रूग्ण व त्यांच्या चार नातेवार्इकांना दवाखाण्यात नेण्यास परवानगी द्दयावी अशी मागणी होत आहे.No comments