BY - केदार नार्इक,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात संचारबंदी
लागू करण्यात आली असून 21 दिवसांचे लॉकडाऊनची घोषणा केली आहे हे माहिती असतांना विनाकारण
रस्त्यावर नागरिक वाहने घेऊन येत असल्याने उल्हासनगर येथिल पोलिसांनी एक वेगळीच कल्पना
आखली आहे.
जो
नागरिक रस्त्यावर वाहन घेऊन येर्इल त्यास विचारणा करून उडवा उडवीची उत्तरे देत अत्यावश्यक
बाबीबाबत कारणी स्प्ष्टीकरण देऊ शकणार नाही अशा वाहनांची हवा काढली जात आहे.त्यामुळे
उल्हासनगर येथिल वाहनांची वर्दळ ही कमी झाली आहे.
जे रूग्णालय,मेडिकल अशा अत्यावश्यक
सेवांसाठी घराबाहेर पडले आहेत त्यांना उल्हासनगर पोलिसांनी सहकार्य केले आहे.कोरोनावर
मात करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांसह,डॉक्टर, नर्स,सैनिक व पत्रकारांनी जे धाडस दाखविले
आहे त्यांची कर्तव्यदक्ष भुमिका सिध्द केली त्याबद्दल त्या सर्वांचे सर्व स्तरातून
कौतूक होत आहे.
Post a comment