0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सरकारने कोरोनाची लोकांना खबरदारी सोपवून लॉकबंधिस्त केले आणि जबाबदारी गेतली याचा फायदा अवैधधंदेवाले जनरल स्टोअर गोदामवाले,किराणावाले,थंडपेय,दारूवाले,गायछापवाले यांच्या पासून पानीचोऊन नेणार्‍या टँकरवाल्यांनी सुध्दा गाडीवर लेबल लावून घेतला आहे.याकडे संबंधित यंत्रणाकडे दुर्लक्ष करत आहे.कोणत्याही  प्रकारे कारवार्इ होत नसल्याने कोरोनावर मात करण्यासाठी एकीकडे लोक घरात बंधिस्त असताना पैसा कमवणार्‍या बाजुला सोडले आहे.
     मुरबाड एम.आय.डी.सी मधील मुख्य पार्इप लार्इनमधून टँकरने पाणी चोऊन नेत असल्याचे समोर आले आहे.सदर  टँकरला अत्यावश्यक सेवा म्हणून कागद लावण्यात आला असून नगरपंचायत,पंचायत समिती कोणतेही यंत्रणा जबाबदारी घेण्यास तयार नाहीत.
मुरबाड तालुक्यात दरवर्षी पाणी चोरी सुरू असते.पाणीटंचार्इ नावाखाली पाण्याचे टँकर चढया भावाने विक्री केली जाते.तसेच पानी टंचार्इ गावात टँकरची मागणी असताना टँकर पोहोचत नाहीत.येथे पाण्यातही भ्रष्टाचार होतोय.प्रशासकीय यंत्रणा रोगावरच्या " मयताच्या " टाळूवरचे  लोणी खाणारे बनले आहेत.

Post a comment

 
Top