web-ads-yml-728x90

Breaking News

मुख्यमंत्री चांगले काम करतात त्यांना अडथळा आणला तर आगरी समाजाशी गांठ आहे- जयेन्द्रदादा खुणे


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
संपूर्ण देशात कोरोनारूपी संकट सर्वांसमोर उभे राहिले असुन या महारोगाला परतवुन लावण्याची आपणा सर्वांचिच जबाबदारी आहे.सर्वांनी आपले पक्ष राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना व महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांना तन, मन, धनाने सहकार्य करण्याची ही वेळ आहे. मुख्यमंत्री चांगले काम करीत असुन ते उल्लेखनीय कार्य करीत असुन सर्वोत्कृष्ठ प्रशासक आहेत.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्याची दखल " वर्ल्ड गिनीज बुक " मध्ये व्हायला हवी अशी माझी मागणी आहे.मात्र त्यांना बदनाम अथवा टार्गेट करण्याची काहीच गरज नाही.जर कोणी त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील संपूर्ण आगरी समाजाशी गांठ आहे. हे लक्षात असुन दया.नाही तर  आपण आगरी समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणु नका.आगरी समाज उद्धवजी ठाकरे यांच्या पाठी खंबिरपणे  उभा आहे. मुंबईत आगरी गावठाणे आणि कोळीवाडे आहेत.आम्हाला सरकारचे पूर्ण सहकार्य लाभते आहे.आम्हाला डिवचविण्याचा पर्यंत करु नका.असे डैशिंग आगरी समाज नेते श्री जयेन्द्रदादा खुणे यांनी व्यक्त केले.उद्धवसाहेब यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सोशल मिडियावर कोरोनाच्या संदर्भात कोणत्या ना कोणत्या विषयावर अडथळा आणण्याचा किंवा विरोध करताना दिसून येत आहे. अशा व्यक्तिवर पोलिस प्रशासनाने त्वरित दखल घेवून कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांच्या परिने अगदी सर्वोत्तम प्रकारे कार्य पार पाडत असुन सरकारला अडचणीत आणण्यासाठी जर कुणी पर्यंत अथवा काही काडया घालण्याचे उद्योग करीत असतील तर ते महाराष्ट्राच्या विरोधात असुन ते अशोभनीय असेच आहे. संकटकाळात राजकारणाची कात बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याने मुख्यमंत्री वारंवार सांगत आले आहेत. परंतु काही लोकांना शांत बसवत नसून ते महाराष्ट्राचे वातावरण बिघडवित आहेत.त्यांना माझी नम्र विनंती आहे की,' आपल्याला महाराष्ट्रातील जनतेला सहकार्य करायचे नसेल तर नका करु.आपण शांत रहा ! घरात बसा ! आपल्या कुटुंबसोबत रहा ! आणि कोरोनाला हरवा !!


No comments