web-ads-yml-728x90

Breaking News

गावठी हातभट्टी पकडून नाश केली दारू,मुरबाड पोलिसांची लॉकडाऊनमध्ये धडाकेबाज कामगिरी...


BY – प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
संचारबंदी आहे लॉकडाऊनमध्ये सर्व पोलिस व्यस्त असेल असा अंदाज त्या गावठी हातभट्टीवाल्याचा खोटा ठरला कारण,लॉकडाऊनसाठी तैन्यात असणारे पोलिस केवळ कोरोनासाठीच नव्हे आपले कार्य आणि जबाबदार ही पेलावत असते हे मुरबाडमध्ये गावठी दारू पकडून तिचा नाश करत पुन्हा सिध्द केले आहे.
          मुरबाड परिसरात काल कोरोनाग्रस्त होम क्वारंटार्इन करणेकामी उप विभगीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपूजे,पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोिाल्स ठाण्याचे नेमणूकीतील पो.उपनिरीक्षक विकास  एस.निकम,परि.पो.उपनिरीक्षक नरेश निंबाळकर,सफौ.आर.आर.तडवी, पो.शि के.एस.पाटील याची पेट्रोलिंगसाठी सज्ज केले होते.
याच पेट्रोलिंगच्या दरम्यान गुप्तपणे पो.उपनिरीक्षक विकास एस.निकम यांना खाटेघर येथे दारूच्या विटभट्टी छुपछुपके प्रकार घडत असल्याची कानकुन मिळाली असता उप विभगीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपूजे,पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या अधिपत्याखाली मुरबाडचे धडाकेबाज पोलिस सज्ज झाले.यामध्ये मध्ये पो.उपनिरीक्षक विकास  एस.निकम,परि.पो.उपनिरीक्षक नरेश निंबाळकर यांची पकड मजबूत ठरली.घटनास्थळी धाड मारून 6 निळे ड्रम त्यामध्ये कमीतकमी 1200 लीटर इतकी दारू होेण्यासाठी नवसागर,गूळ व वॉश रसायने ड्रमसह किसू असा एकूण 64 हजार 150 रूपयाच्या आसपास मुद्देमाल मुरबाड पोलिसांनी हस्तगत करून अज्ञात इसमाच्या गावठी दारूची हतभट्टीचा नाश केल्याने पोलिसांची करडी नजर सर्व  ठिकाणी आहे हे दाखवून दिले आहे.
या धडाकेबाज कार्यामुळे सर्वत्र मुरबाड पोलिसांचे कौतूक होत आहे कारण,संचारबंदी,लॉकडाऊन त्यात पेट्रोलिंग तसेच आपले काम याची जोपासणी महाराष्ट्र पोलिस म्हणून अभिमान करणारी ठरत आहे.
मुरबाड विकासमंचच्या अध्यक्षा सौ.ज्योती नामदेव शेलार यांनी उप विभगीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपूजे,पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोराटे,पो.उपनिरीक्षक विकास  एस.निकम,परि.पो.उपनिरीक्षक नरेश निंबाळकर,सफौ.आर.आर.तडवी,पो.शि के. एस.पाटील यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्व मुरबाड करांच्या वतीने त्यांचे अभिनंदन मानले आहेत.No comments