web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडमध्ये ठाणे जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे नागरिकांकडून पालन मात्र,व्यापार्यांकडून ट्रकने माल वाहतुक

BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाचं पालन मुरबाड मधील गोरगरिब भाजीपाला,दुधवाला,किराणा दुकानदार,तमाम नागरिकांनी रात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेल्या बंदचे पालन केले मात्र,मुरबाडमध्ये मोठया व्यापार्यांनी धान्यवस्तुची गोदामे खाली करून दुकानात मालसाठा जमा केल्याने कडकडीत बंदला हारताल फासला आहे.त्यांच्यावर कोण कारवार्इ करणार ? असा नागरिकांनी सवाल केला आहे.
10 एप्रिल ते 14 एप्रिल रात्रौ 12 वाजेपर्यंत मुरबाड शहारातील सर्व दुकाने,भाजीपाला,दुध,किराणा बंद ठेवून,गल्लीबोलातील रस्ते बंद ठेवले आहेत.लोकांनी त्यांचे पालन केले आहे.एकही नागरिक दुकानदार रस्त्यावर आलेला नाही.ग्रामीण भागातील दुध,भाजीपाला गावाच्या बाहेर गेला नाही परंतू मुरबाड शहारात काही व्यापारी गोदामातील धान्य अन्य वस्तु दोन ट्रक मध्ये भरून दुकानात वाहतूक करत होते त्यांना मुरबाड नगरपंचायतीने सहकार्य केल्याचे व्यापारी सांगत असून शासनाने गरिबांना दुध,भाजीपाला घरात कोंडून मोठया व्यापार्यांना कशी संधी दिली अशी नाराजी व्यक्त होत आहे.गाडी नं.MH 04 DS 9464 यामधून माल वाहतूक करण्यात आली.एका व्यापार्यांनी युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले आहे की,नवी मुंबर्इ,कल्याण वरून धान्य अन्य वस्तुचा ट्रक पहाटे पाच वाजता मुरबाडमध्ये आला.त्यातील माल दुकानदारांच्या दुकानासमोर टाकून गाडी निघून जाणार असल्याची माहिती दिली तर तहसिलदारांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

No comments