0

BY - युवा  महाराष्ट्र लाईव्ह - नवी दिल्ली -  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान हा व्हायरस चीनच्या लॅबमधून लीक झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच वेळीत कोरोना विषाणूचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवण्याचा पुरावा आढळल्यास त्याचे परिणाम सहन करण्यास तयार राहा असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. तसेच कोविड-19 विषयी चीनची रहस्यमय शैली, रोगाशी संबंधित तथ्यांबाबत पारदर्शकतेचा अभाव आणि सुरुवातीच्या काळात अमेरिकेशी असहकार याविषयी ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली आहे.

Post a Comment

 
Top