0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
संचारबंदी लागू करण्यात आली त्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.कारोनावर मात करण्यासाठी सरकारनी कटिबध्द पाऊले उचलली असून नागरिकांनीही  100 टक्के प्रतिसाद  दिला आहे.आपल्या देशात कोरोनानी थैमान घातला असून कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्याचे तसेच अहोरात्र कर्तव्यदक्षाची भुमिका साकारून निर्भिड कार्य डॉक्टर,पोलिस,शासकीय कर्मचारी यांनी केले आहे.अशा धडाकेबाज व स्वतःच्या जीवाची  पर्वा न करता जबाबदारी पार पाडणार्‍या डॉक्टर,पोलिस,शासकीय कर्मचारी तसेच गरजूंना अल्पहाराचे वाटप करण्यात आले.या अल्पहाराचे वाटप आरपीआय (अ) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळाराम गायकवाड,सरचिटणीस बाळासाहेब भालेराव,कार्याध्यक्ष अनिल धनगर,मुरबाड शहाराध्यक्ष कैलास देसले यांनी करून माणूसकी जपली आहे.मुरबाड तालुक्यासह भिवंडी,अंबरनाथ,बदलापूर, उल्हासनगर, कल्याण,ठाणे येथिल पोलिस प्रशासक,शासकीय कर्मचारी,व गरिब गरजूंना अल्पहार वाटप करून समाजातील दानशूरांनी ज्या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा उपलब्थ करून मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही ठाणे जिल्हाध्यक्ष बाळाराम गायकवाड यांनी केले आहे.

Post a comment

 
Top