web-ads-yml-728x90

Breaking News

वनविभाग अधिकार्यांनी माणूसकीची झरी राखली ; त्या दोन हरणाच्या पिल्लांवर आपली छत्रसावली टाकली


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
कोरोना विषाणू  वर मात करण्यासाठी सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा सज्ज असताना आपली भुमिका बजावताना दिसत आहे.याच भुमिकेतून माणसातला माणूस आज माणूसकी जपून राहिला आहे.काल 12 ते 15 दिवसांची नवजात हरणाची 2 पिल्ले जंगलात आपल्या आईपासून दूरावून मौजे खांडेवाडी(आसोळे),ता. मुरबाड येथिल एका आदिवासी गुराख्याच्या बकरींचे कलपामध्ये आली होती.
त्यावेळी कर्तव्यावर असणारे उपवनसंरक्षक ठाणे रामगांवकर व सहा.वनसंरक्षक ठाणे व मुरबाड कोळेकर व पशुवैद्यकीय अधिकारी संगाराऊ,डॉ.श्री. पेठे यांचे मार्गदर्शनाखाली वाईल्ड लाईफ वॉर्डन श्री.पवन
 शर्मा,मुरबाड(प.) चे आ.एफ.ओ रमेश रसाळ व मुरबाड(प.) रेंज स्टाफ यांचे सहकार्याने सदर हरणाचे पिल्लांना ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचार व देखरेखीसाठी संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवली, मुंबई येथे दाखल केली आहेत.त्यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

No comments