web-ads-yml-728x90

Breaking News

व्यवसायिकांच्या कामगारांना शासनाने आर्थिक मदत द्दयावी - मन्साराम वर्मा

BY – विशेष प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लाइव 
– ठाणे |
संपुर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाली.त्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाले.अशावेळी कंपनी कामगार,शासकीय अधिकारी वर्ग,व अन्य विभागातील नागरिकांना पगार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.परंतु बिल्डर लार्इनमध्ये कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेले नाही त्यामुळे शासनांनी बिल्डर लार्इनमधील असणारे सर्व कामगार,रोजगारांना मदत मिळावी अशी मागणी सर्व व्यवसायकांनी केली आहे.नोटाबंदीनंतर थंडावलेले काम त्यात कोरोनाने घातलेला थैमान यामुळे सर्व बिल्डर व्यवसाय लार्इनची कामे ठप्प झाली आहेत अशावेळी व्यवसाय मालकांनी  ज्या ज्या प्रकारे मदत करायची ती केली परंतू आत्ता स्वतःच्या घराची परिस्थिती ही दुर्बलते मधून जात असल्याने कामगारांना मदत करणे अशक्य होत असल्याने शासनानी सर्व व्यवसायीकांकडे काम करणारे कामगारांना आर्थिक मदत करावे अशी मागणी व्यवसायक मालक मन्साराम वर्मा यांनी शासनाकडे या प्रसिध्दी माध्यमातून केली आहे.व्यवसायकांकडे कामगारांची संख्या ही 50 च्या पुढे आहे.त्यांनी कष्ट करत घाम गाळले असे काँट्रॅक्टवर काम करणारे कामगार यांना लॉकडाऊन पासून आर्थिक मदत केली परंतू पुढिल परिस्थिती ही ढासळल्याने व्यवसायीकांच्या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते अशावेळी शासनाने व्यवसायिकांना तथा त्यांच्या कामगारांना आर्थिक मदत मिळावी अशी चिराग इटरप्रायजेसचे मालक मन्साराम वर्मा यांच्यासह सर्व व्यवसायिकांनी शासनाकडे केली आहे.पुढिल 14 दिवस कोरोनावर मात करण्यासाठी सर्व कामगारांनी सहकार्य केले आहे परंतु पोटा पाण्याची खिनगी भरण्यासाठी मालक किती दिवस पोट भरणार,त्याचे कुटूंबही आज उधाराचे रेशन मागून गरजा भरत आहे.या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष वेधावे अशी मागणी मन्साराम वर्मा यांनी केली आहे.


No comments