BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |
कोरोना संसर्गाने जगभर मोठा हाहाकार माजवला आहे. आपल्या देशातही
संसर्ग सुरु आहे. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जिल्हा
प्रशासन अहोरात्र काम करत आहे. लोकांनी भीती न बाळगता, घरात बसून पूर्ण दक्षता घ्यावी
याचे आवाहन वारंवार केले जात आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या
आहेत.
त्यात रुग्णालय आणि मेडिकल हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून लोणंद
ता. खंडाळा जि. सातारा येथील 80 डॉक्टर आणि निरा येथील 20 डॉक्टर्सनी मिळून ‘रक्षक
रुग्णालय’ ही अभिनव संकल्पना राबविली आहे. त्या संदर्भात डॉ. मिलिंद काकडे यांच्याशी
संवाद साधून हा लोकोपयोगी आणि डॉक्टरांच्याही सुरक्षेला प्राधान्य देणारी संकल्पना
काय आहे त्याचा घेतलेला हा वेध…कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये सर्वसामान्य जनतेला सुरक्षितपणे
आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी लोणंद मेडिकल
असोसिएशनचे डॉ. मिलिंद काकडे व इंडियन मेडिकल
असोसिएशनचे निरा शाखेचे अध्यक्ष डॉ. नितीन
सावंत यांनी संयुक्त विद्यमाने लोणंद परिसरातील
100 डॉक्टरांना एकत्र करुन श्री सिद्धीविनायक हॉस्पिटल, निरा रोड, लोणंद येथे रक्षक
क्लिनिक सुरु केले आहे. हे ‘रक्षक क्लिनिक’ लोणंद परिसरातील नागरिकांसाठी संजीवनी ठरत
आहे.
या क्लिनिकमध्ये लोणंद व लोणंद परिसरातील
नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, घशात दुखणे, दम लागणे इत्यादी आजारांवर तपासणी करुन
औषधोपचार करत आहेत. या क्लिनिकच्या माध्यमातून सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नागरिकांना
आरोग्य सुविधा देण्याचे काम करीत आहेत. तसेच दररोज येणाऱ्या रुग्णांना कोणता आजार आहे,
त्याचबरोबर प्रत्येक दिवशी किती रुग्णांनी रक्षक क्लिनिकमध्ये येऊन तपासणी व औषधोपचार
करुन घेतले याची सर्व माहिती रोजच्या रोज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला देण्यात
येत आहे.
Post a comment