web-ads-yml-728x90

Breaking News

नागरिकांनी घराबाहेर पडू नये,घरात रहा सुरक्षित रहा,शासनास सहकार्य करा - ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
कोरोनाचा थैमान पाहून कोरोनाचा आकडा सर्वांच्या समोर येत आहे.संचारबंदी लागू करण्यात आले असूनही अत्यावश्यक सेवा या सुरू असून गर्दी करण्यात  येऊ नये तसेच अन्न धान्याचा साठ अपुरे नाही,शक्यतो सर्व नागरिकांनी  घराबाहेर पडू नका पुढिल काही दिवस  हे महत्वाचे असून कोरोनावर मात करण्यासाठी घरात राहा,सुरक्षित रहा,सर्व नागरिकांनी शासनास सहाकार्य करावे असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तमाम जनतेला केले आहे.आकडा वाढण्याएैवजी आपल्याला तो  कमी करून करोनावर मात करायचे आहे त्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली आहे.महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स,पोलिस,सैनिक,पत्रकार हे कर्तव्यदक्ष भुमिका बजावत आहेत.त्यांच्या या भुमिकेला संपुर्ण भारत देश सलाम करत आहे अशा निडर,जबाबदार भुमिका बजावणार्‍यांविषयी जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच.अहोरात्र कारोनावर मात करण्यासाठी ते मेहनत घेत आहे अशावेळी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे,आपल्या परिसरातील संशयित आढळल्यास संबंधित नेमलेल्या प्रशासकांना तात्काळ कळविण्यात यावे तसेच नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच थांबून कोरोनावर मात करण्याचे आवाहन आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तमाम जनतेला केले आहे.

No comments