0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांने अखेरचा श्वास घेतला. डायरेक्टर शुजित सरकार यांनी याविषयी ट्विट केलं आहे. इरफान खानला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती.इरफान खान हा बॉलिवूडमधील प्रतिभावंत कलाकार होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. इरफानला दोन वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराचे निदान झाले होते. परदेशात या आजारावर उपचार करून इरफान खान बरा झाला. भारतात परतल्यानंतर इरफान खानने इंग्रजी मीडियम सिनेमात काम केले. हा सिनेमा इरफानच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला आहे.

Post a comment

 
Top