web-ads-yml-728x90

Breaking News

गुटखा गेला तंबाखु आली ; गठ्ठा तंबाखु 40 रूपये झाली


BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
लॉकडाऊन काळात मुरबाड तालुक्यात बनावटी गुटखा संपला अन सुरूवात झाली ती गठ्ठा तंबाखूची.पान टपर्‍या बंद करण्यात आल्या परंतू व्यवसायिक लोकांनी या पानटपर्‍यांची सुरूवात त्यांच्या गोडाऊन मधून तंबाखु च्या गठ्ठा पुडयांनी केली असल्याची माहिती समोर येत आहे.जी तंबाखू 7 रूपयांनी जायाची  ती  व्यवसायिक जादा भावाने छुप्यारूस्तम ने विक्री करत आहे तर त्यावर दुकानदार हा चक्क 40 ते 50 रूपयात विक्री करत आहेत.अम्लयुक्त पदार्थ बंद करण्याच्या सुचना मिळाल्या असताना तंबाखू बाहेर कशी पडली असा सवाल नागरिकांनी शासनाला केला आहे.युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी सर्व ठिकाणी बारकार्इने लक्ष ठेवून असल्याने कधी दारूभट्टी,कधी गुटखा,कधी जुगार,तर कधी  अम्लयुक्त पदार्थ यांच्या दोन नंबरीच्या घडामोडींचा आढावा शासनासमोर वृत्तांकनच्या माध्यमातून आणून दिले आहे.पहिले तर मुरबाड सारख्या ग्रामीण भागात कोरोना नाहीच.त्यात रेड झोन पडला असतांना अत्यावश्यक सेवा ग्राहकांना मिळवून देण्यात मुरबाड तहसिलदार,मुरबाड पोलिस अधिकारी,मुरबाड नगरपंचायत,सर्व प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी कार्यरत असतांना नोड अधिकारी जगन्नाथ जाधव यांची धडाकेबाज कामगिरी कोरोनाला मुरबाडच्या वेशीबाहेरच ठेवून आहे.हे सर्व प्रशासक चांगले काम करत असतांना त्यांना सहकार्य करण्याएैवजी अम्लयुक्त पदार्थांची छुप्यापध्दतीने जादा भावाने विक्री करून अनेक रोगांना आमंत्रण देणारे मुरबाडचे तंबाखू व्यवसायिकांनी शासनाच्या आदेशाला दुजोरा दिला आहे.तंबाखू विक्रेता  हा मुरबाडचा नामवंत विक्रेता असून गठ्ठा तंबाखूची आयात निर्यात त्याच्या दुकानाच्या मागून होत असल्याने वेळ आणि ठिकाण अद्दयाप कळाले नसून कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळील पोलिस ठाण्यात व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.No comments