web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हयातील खरेदी ठिकाणीची गर्दी रोखण्यासाठी 4 दिवसाचा 100 टक्के लॉकडाऊन ठेवण्याचा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्हयातील महानगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत यांचे क्षेत्रात अत्यावश्यक खरेदी करिता बाहेर जावून खरेदी करण्याची सुट देण्यात आली होती परंतू या खरेदी वेळी मोठया प्रमाणात लोक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले.कोणीही संचारबंदी,आदेशाचे पालन करत नसून आदेशाचे भंग करत असल्याचे पाहण्यात आले.आवाहन करूनही,कारवार्इ होऊनही नागरिकांना कोणताही फरक पडला नसून सदर परिसरात  कोरोना विषाणूचा (कोव्हीड -19) प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होण्याची शक्यता नाकारा येत नसल्याने महानगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत क्षेत्रातील भाजीमंडर्इ/बाजीपाला/बाजार/फळबाजार व सर्व फळे तसेच भाजीपाला दुकाने काही कालावधीकरीता बंद ठेवणे अवश्यक असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आपल्या पत्राद्वारे संबंधितांना आदेश दिले आहेत.ठाणे जिल्हयातील महानगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत हद्दीतील वरील नमूद सर्व दुकाने 10/04/2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून 14/04/2020 रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश पत्रकात म्हंटले आहे.नागरिकांना सुट देऊनही नागरिक सदरच्या कोरोना विषानूची बाब गांभिर्यपणे घेतली नसल्याचे निदर्शनास आल्यावर सदरील निर्णय ठाणे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन 2005 व उपोद्घातील अ.क्र.3 मधील शासन अधिसुचनेनुसार घेतले असून महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 चा नियम 10 (ए) प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून घेण्यात आला आहे.सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ अथवा विरोध केल्यास कायदेशीर/दंडनीय कारवार्इ करण्यात येर्इल असेही ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश पत्रकात म्हंटले आहे.1 comment:

  1. मीर्केट चार दिवस बंद राहिल, पुढे काय,लोक परत गर्दि करणारच परत पहिले पाढे पंचावन्न, मग काय परत बंद करणार,हे साऱख असच चालु रहाणार,या वस्तु लोकांच्या घरापर्यंत पोचल्या तरच गर्दि कमि झालीतर होईल,लोक(जास्त करून बायका नादिष्ट आहेत).बाजारात गर्दि करीतच राहाणार,योग्य, ठोस उपायांची गरज आहे,विचार करून डोक फुटायची वेळ आली आहे,

    ReplyDelete