BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोरोना युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला
राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला आहे आरोग्य
क्षेत्राशी सबंधित 21 हजार जणांनी कोरोना नियंत्रणाच्या कामात सहभागी होण्याची इच्छा
व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी रितसर अर्ज केले असून आता या अर्जांची छाननी होत
आहे. यानंतर या व्यक्तींना त्या त्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी कोरोनाच्या या लढ्यात शासनाला प्रत्यक्ष सहभागी होऊन मदत करावी असं आवाहन केलं.
यानंतर डॉक्टर्स, आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय,
आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतू ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळालं नाही
असे इच्छुक अशा अनेकांनी पुढे येऊन आपले नाव, पत्ता covidyoddha@gmail.com या ई मेलवर
नोंदवावे असं आवाहन करण्यात आलं होतं.मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर अवघ्या 5 दिवसांत
21 हजार जणांनी विविध अर्ज करुन तशी इच्छा व्यक्त केली. यामध्ये 943 डॉक्टर्स,
3312 परिचारिका, 1141 फार्मसिस्ट, 863 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 766 वार्ड बॉय, 614 पॅरा
वैद्यकीय, 569 इतर वैद्यकीय, 76 सैन्यातील निवृत्त जवान यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त
इतर व्यक्तींमध्ये समाज सेवक, वैद्यकीय स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अर्ज करण्यात
आलेले देखील अनेकजण आहेत. या सर्वांसाठी एक गुगल फॉर्म देण्यात आला आहे. त्यातून सुमारे
18 हजार व्यक्तींनी हे फॉर्म भरुन दिले.
Post a comment