web-ads-yml-728x90

Breaking News

'Yes बँके'च्या माजी संचालकांच्या घरावर ईडीची धाड

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
येस बँकचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांच्या घरावर काल (6 मार्च) रात्री ईडीने (प्रवर्तन निदेशालय) धाड (ED Raid on Rana Kapoor Home) टाकली. तसेच राणा कपूर यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांना लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ते आता देश सोडून जाऊ शकत (ED Raid on Rana Kapoor Home)  नाहीत.राणा कपूर यांचे वरळीमध्ये घर आहे. वरळीतील समुद्र महल या बिल्डिंगमध्ये ते राहतात. ईडीने काल रात्री अचानक राणा यांच्या घरावर धाड टाकली. रात्रभर ईडीने त्यांची चौकशी केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली आहे.

No comments