0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
ग्राहकांना मागणीनुसार हॅन्ड सॅनिटायजर आणि मास्क उपलब्ध करून द्यावेत, औषध विक्रेत्यांनी विनाकारण त्याचा साठा करून ठेऊ नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले. राज्यात उद्भवलेल्या कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख औषध उत्पादक आणि वितरक यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरूण उन्हाळे, ऑल इंडिया केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे आणि मान्यवर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.डॉ.शिंगणे म्हणाले, सध्या सॅनिटायजर आणि मास्क यांची मागणी वाढली आहे. तेव्हा ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपल्या दुकानात मुबलक प्रमाणात चांगल्या दर्जाचे उत्पादन ठेवा आणि योग्य किंमतीतच ते विका अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हात साबणाने धुवा, स्वच्छता राखा, सर्दी खोकला किंवा आजारपणाचे लक्षणं वाटत असतील तर तपासणी करून घ्या. स्वत:ला इतरांपासून दूर ठेवा, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले.

Post a comment

 
Top